मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश – eNavakal
News देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश

लखनऊ- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील जेडीयूचे अध्यक्ष अनूप सिंह पटेल यांनी 12 ऑक्टोबरला उपाध्याय यांना नियुक्ती पत्र दिले. तसेच जेडीयूने त्यांची उत्तर प्रदेशात माजी सैनिक सेलच्या राज्य संयोजकपदी नियुक्ती केली असून लवकरच उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर जाणार असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले आहे.

रमेश उपाध्याय हे भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आहेत. 2008 साली मालेगावातील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर तसेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासोबत रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. 2017 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली असून सध्या ते पुण्यात आहेत. जेडीयूत प्रवेश केल्यानंतर उपाध्याय यांनी म्हटले कि, उत्तर प्रदेशातील जेडीयूच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जेडीयूसाठी काम करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही. पण, पक्षाच्या कामासाठी लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. मला जेडीयूचे नेतृत्व तसेच सामाजिक न्यायासोबतच विकासासाची संकल्पना आवडते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय यांचा जेडीयूत प्रवेश

लखनऊ- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील जेडीयूचे अध्यक्ष अनूप...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चंद्रपुरात नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यालाच पिंजर्‍यात बसवले

चंद्रपूर – नरभक्षक वाघ किंवा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते नाहीतर बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी...
Read More
post-image
News देश

श्रीकृष्ण जन्मभूमी मालकी हक्क

मथुरा (उत्तर प्रदेश)- मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीच्या हक्काची याचिका मथुरेतील जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. यापूर्वी ही याचिका मथुरेतील सिव्हिल कोर्टाने नाकारली होती. या सिव्हिल...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली

मुंबई- विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 27 नंबरची बेस्ट मिनी बस दुभाजकाला धडकल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घडला आज शनिवारी घडली..ही बस भांडूप येथून वरळीकडे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More