मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर यांची राजकारणात एन्ट्री, पक्षाने नियुक्तीपत्रही दिले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर यांची राजकारणात एन्ट्री, पक्षाने नियुक्तीपत्रही दिले

लखनऊ – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी ठरलेले रमेश उपाध्याय यांनी राजकारण एन्ट्री केली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) या पक्षात त्यांनी प्रवेश केलाअसून जदयूचे अध्यक्ष अनूप सिंह पटेल यांनी 12 ऑक्टोबरला उपाध्याय यांना नियुक्ती पत्र दिले. तसेच जदयूने त्यांना उत्तर प्रदेशात माजी सैनिक सेलच्या राज्य संयोजकपदी नियुक्त केले असून लवकरच उत्तर प्रदेशच्या दोऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रमेश उपाध्याय हे भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आहेत. 2008 साली मालेगावातील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर तसेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासोबत रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. 2017 मध्ये त्यांना जामीन मिळाला असून ते सध्या पुण्यात आहेत.

पक्षप्रवेशाबद्दल रमेश उपाध्याय म्हणाले, “उत्तर प्रदेशातील जदयूच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जदयूसाठी काम करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी निवडणूक लढण्याचा माझा कोणताही विचार नाही. पण, पक्षाच्या कामासाठी लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. मला जदयूचे नेतृत्व तसेच सामाजिक न्यायासोबतच विकासासाची संकल्पना आवडते.”

तसेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपांबद्दल विचारले असता, मी निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. मी एक राष्ट्रवादी आणि सच्चा देशभक्त असून, मालेगाव प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीनं गोवल्याचंही ते म्हणाले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर यांची राजकारणात एन्ट्री, पक्षाने नियुक्तीपत्रही दिले

लखनऊ – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी ठरलेले रमेश उपाध्याय यांनी राजकारण एन्ट्री केली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) या पक्षात त्यांनी प्रवेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात, २५ प्रवासी जखमी

मुंबई – मुंबई लोकल बंद असल्याने जीवनवाहिनी ठरलेली बेस्ट बसचा प्रवासही आता जोखमीचा ठरला आहे. विक्रोळीत बेस्टच्या मिनी बसचा आज अपघात झाला. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश

जगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडी, शहापूर भागात भातपीक जमिनीखाली, पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांचा नकार

भिवंडी – भिवंडी व शहापूर ग्रामीण भागात होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना देखील प्रशासन...
Read More