मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ४ आरोपींना जामीन – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ४ आरोपींना जामीन

मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. या आरोपींमध्ये लोकेश शर्मा, धन सिंह, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया यांचा समावेश आहे.

याप्रकरणी भाजपच्या भोपाळमधील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विशेष एसआयए न्यायालयात यापूर्वी हजर करण्यात आले होते. त्यांनी आपल्याला या हल्ल्याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले होते. तसेच दुसरे आरोपी सुधाकर द्विवेदीनेदेखील विशेष न्यायालयात याबाबत आपल्याला काही माहित नसल्याचेच म्हटले होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ८ सप्टेंबर २००६ साली मशिदीशेजारी साखळी बॉम्बस्फोट हल्ला घडवण्यात आला होता. या भीषण हल्ल्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता तर १०० हून अधिकजण जखमी झाले होते. त्यानंतर हल्ल्यासंबंधी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More