मालवण नगराध्यक्षांच्या निलंबनासाठी उपोषण सुरु – eNavakal
News महाराष्ट्र

मालवण नगराध्यक्षांच्या निलंबनासाठी उपोषण सुरु

सिंधुदुर्ग – मालवणात गेल्या आठवड्यात गाजलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात दोषी आढळून आलेल्या महेश कांदळगावकर या नगराध्यक्षांनी नैतिकता स्वीकारून अद्याप राजीनामा दिलेला नाही. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेच्या चौकशीसाठी अद्याप चौकशी समितीही नियुक्त केलेली नाही. या निषेधार्थ भाजपाचे पालिकेतील गटनेते तथा बांधकाम सभापती गणेश कुशे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मालवण पालिका कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. या प्रकरणात तात्काळ चौकशी समिती नियुक्त करावी, तोपर्यंत नगराध्यक्षांचे निलंबन करावे, अशी मागणी करत हे उपोषण आंदोलन सुरू केले आहे. जोपयर्र्ंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे कुशे यांनी म्हटले आहे. या उपोषण आंदोलनात माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा सरकारे, पूजा करलकर, राजू आंबेरकर, विकी तोरसकर, विलास हडकर, आबा हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More