मालमत्तेची माहिती लपविल्याने आ. बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

मालमत्तेची माहिती लपविल्याने आ. बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल

* मुंबईत 43 लाख 46 हजार
रुपयांच्या मालकीचा फ्लॅट
* नगरपरिषदेच्या नगरसेवकाची तक्रार
नागपूर – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचा आरोप आहे. त्यावरून चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली. तिरमारे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी आमदार कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित यंत्रणेकडून त्यासंदर्भातील माहिती प्राप्त केली असता, त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. 19 एप्रिल 2011 रोजी त्याचा ताबा कडू यांनी घेतला. अचलपूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना कडू यांनी मुंबई येथील मालमत्तेसंदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले होते. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्ते तिरमारे यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांच्याविरोधात आज अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More