मारुती सुझुकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश

मारुती सुझुकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – ऑटोमोबाईल क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने सर्व डिझेल कारची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2020 पासून BS 6 एमिशन नियम लागू होणार असून डिझेल कारचं उत्पादन थांबवणार असल्याचे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आर.सी.भार्गवा यांनी म्हटले आहे. देशात डिझेलच्या वाढत्या दरांचा आणि भारत स्टेज 6 (BS VI ) या अंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने हा मोठा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

1 एप्रिल 2020 पासून कंपनी डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबवणार आहे. 2022 पर्यंत कंपनीला कॉर्पोरेट एव्हरेज फ्यूल इफिशिएन्सी नॉर्मपर्यंत पोहोचता यावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. सीएनजी गाड्यांचा जास्त शेअर आम्हाला सरकारच्या नवीन नियमांचं पालन करण्यासाठी मदत करेल. या नव्या सरकारी पॉलिसीमुळे बाजारात सीएनजीची डिमांड वाढेल, अशी आम्हाला आशा आहे, असे आर.सी.भार्गवा यांनी सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More