मारिया सुसाईराजला दणका! अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला – eNavakal
News क्रीडा न्यायालय

मारिया सुसाईराजला दणका! अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

मुुंबई, प्रतिनिधी- कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मुंबईत गाजलेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडातील प्रमुख आरोपी मारिया सुसाईराजला उच्च न्यायालयाने आज दणका दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आज मारियाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
मुंबईतील मुंबईत गाजलेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने 2011 दोषी ठरवून तीन वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या मारियाने शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने वेगवेगळी आमिष देऊन ठाण्यातील छोटे मोठे उद्योगपती, व्यावसायिकांभोवती जाळे टाकण्यास सुरूवात केली. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 15 कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मारीया सह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. चौघाजणांना अटकही केली. या प्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्याने मारीयाने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने मारीयाला यापूर्वी 1 कोटी रूपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही रक्कम जमा न केल्याने अखेर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More