मायावतीच्या धमकीनंतर कमलनाथ सरकारची घोषणा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मायावतीच्या धमकीनंतर कमलनाथ सरकारची घोषणा

भोपाळ – मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिल्यावर आत बहुजन समाज पार्टींच्या सर्वेसर्वा मायावतींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बसपाच्या 2 एप्रिल 2018 रोजी मध्य प्रदेशात झालेल्या भारत बंद दरम्यान बसपाच्या ज्या कार्यकर्त्यांवर त्यावेळीच्या भाजप सरकारने टाकलेले गुन्हे त्वरित मागे घ्या, अन्यथा बसपा मध्य प्रदेशमधील काँगेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून येईल, अशी धमकी काल सोमवारी मायावतींनी दिली होती. त्यांच्या या धमकीला वजन प्राप्त झाले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ‘राजकीय द्वेषातून’ भरण्यात आलेले खटले मागे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तूर्त कमलनाथ सरकारला असलेला धोका टळला आहे.

सरकार स्थापन होऊन एक महिनाही पूर्ण झालेला नाही तोच बसपाच्या नेत्या मायावती यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रभावहीन करण्याच्या विरोधात 2 एप्रिल रोजीच्या ‘हिंदुस्थान बंद’ वेळी राजस्थान, मध्य प्रदेशातही दलितांचे आंदोलन झाले होते. त्यावरून दलित आंदोलकांवर भरण्यात आलेले खटले त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी मायावती यांनी कमलनाथ यांच्या सरकारकडे केली आहे. आमची ही मागणी मान्य केली गेली नाही तर बसपाने काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा निरर्थक ठरेल. मध्य प्रदेशात सरकारला बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर आम्हाला फेरविचार करावा लागेल, असे मायावती यांनी सांगितले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More