मान्सून परतीच्या मार्गावर! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

मान्सून परतीच्या मार्गावर! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. मात्र आता हा अडथळा दूर झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे आता २२ आणि २३ ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारीपट्टी भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या नागालँड, मिझोरम व त्रिपुरा आणि शनिवारी आसाम व मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर, इत्यादी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

मान्सून परतीच्या मार्गावर! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील अनेक दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,609, पुण्यात 1,020 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,17,658 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. बुधवारी आढळलेल्या 8 हजार 142 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकातावर ‘विराट’ विजय

अबुधाबी – विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सहज मोठा विजय मिळवला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी या सामन्यात अचूक आणि भेदक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

उस्मानाबाद – नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार...
Read More
post-image
महाराष्ट्र

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याकरता आढावा बैठक, चर्चेनंतर निर्णय होणार

मुंबई – महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चेअंती निर्णय घेता येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन,...
Read More