मानोरा-दिग्रस रस्त्यावर अपघात; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

मानोरा-दिग्रस रस्त्यावर अपघात; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

वाशिम – वाशिममधील मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील पॉवरहॉऊसजवळ कारने मोटरसायकला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला असून आई वडिल गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडला.

वाईगौळ येथील शंकर पंजाब सोंगे (33), शितल शंकर सोंगे (24), मुलगा हरिओम शंकर सोंगे (6) सोम शंकर सोंगे (3) हे मोटरसायकलने दिग्रसला येत होते. दिग्रसवरून मानोराकङे जाणारी ही कार भरधाव वेगाने येत होती. या भरधाव वेगाने येणार्‍या कारने मोटरसायकलला जोरची धडक देऊन त्यात हरीओम व सोम हे दोन भाऊ जागीच ठार झाले. तर मृत्यू पडलेल्यांची आई शितल व वडिल शंकर गंभीर हेही गंभीर जखमी आहेत. या आई-वडिलांना दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…अन्यथा दिल्लीत पेट्रोल पंप बंद राहणार

नवी दिल्ली – पेट्रोल-डीझेलच्या व्हॅटमध्ये कपात न केल्यास दिल्लीतील पेट्रोल पंप संचालकांनी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात दिल्लीतील चारशेहून...
Read More