मानखुर्दच्या चर्च आणि स्मशानभूमीतून जाणार मुंबई ‘मेट्रो-2 बी’चा मार्ग – eNavakal
मुंबई वाहतूक

मानखुर्दच्या चर्च आणि स्मशानभूमीतून जाणार मुंबई ‘मेट्रो-2 बी’चा मार्ग

मुंबई – मुंबई ‘मेट्रो-2बी’चा मार्ग मानखुर्दमधील ऐतिहासिक चर्च आणि स्मशानभूमीतून नेण्याचा नवा प्रस्ताव असून या प्रस्तावाला स्थानिक ख्रिश्चन बांधवांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आमच्या धार्मिक आणि पारंपरिक वास्तूवर मेट्रोसाठी गदा आणली तर आम्ही शांत बसणार नाही, तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराच स्थानिक ख्रिश्चन बांधवांनी दिला आहे.

मानखुर्द पूर्वेला 16व्या शतकातील सेंट अँथोनी चर्च आणि त्याच्या बाजूलाच ख्रिश्चन बांधवांची स्मशानभूमीसुद्धा आहे. हा परिसर मानखुर्द गावठाण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी ख्रिश्चन बांधवासह सर्वधार्मिय कुटुंबे राहतात. त्यात मराठी कुटुंबेही आहेत, या सर्वच कुटुंबांना आणि चर्चला व स्मशानभूमीला हटविण्याचा डाव एमएमआरडीएने रचला असल्याचा आरोप होत आहे.

मुंबई ‘मेट्रो-2 बी’च्या मार्गाचा मूळ आराखडा कुणालाही बाधित न करणारा आहे. चर्चपासून काही अंतर दूरवरून तो जाणारा आहे. तरीही इथल्या सर्व स्थानिकांना बेघर करणारा, जाचक असा नव्या आराखड्याचा प्रस्ताव पुढे रेटला जात आहे. या नव्या आराखड्याला सेंट अँथोनी चर्चचे फादर रूई कोमेलो यांनी तीव्र विरोध करीत हा प्रस्ताव मागे घेण्यात यावा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे सहाय्यक आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुंबईसाठी ऐतिहासिक वारसा असणार्‍या चर्च आणि कॅथॉलिक स्मशानभूमीतून मुंबई ‘मेट्रो-2बी’चा मार्ग नेण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. या ठिकाणी सहकारी मंडळी, ज्येष्ठ नागरिक आहेत. 80 ते 90 वर्षांचे वय असणार्‍या या मंडळींना आपण बेघर होण्याच्या भीतीने मानसिक धक्का बसला आहे. तसेच पर्यायी जागा असतानाही स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचा हा प्रयत्न असून स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More