मानखुर्दच्या ‘कुर्ला स्क्रॅप’ परिसरातील 62 अतिक्रमणे तोडली – eNavakal
News मुंबई

मानखुर्दच्या ‘कुर्ला स्क्रॅप’ परिसरातील 62 अतिक्रमणे तोडली

मुंबई – पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागातील मानखुर्दमध्ये ‘मंडाळा’ भागात ’कुर्ला स्क्रॅप’ परिसर आहे. याच परिसरातील सुमारे 4 एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे, दुकाने इत्यादी व्यावसायिक स्वरूपाची बांधकामे उद्भवली होती. याबाबत मुंबई उपगनर जिल्ह्याच्या संबंधित कार्यालयास पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाद्वारे यापूर्वीच कळविण्यात आले होते. या अनुषंगाने चेंबूर भागाचे उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन) यांनी या अतिक्रमण कारवाईसाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरविण्याची मागणी ‘एम पूर्व’ विभागाकडे केली होती.
यानुसार आवश्यक ती यंत्रसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देत ‘कुर्ला स्क्रॅप’ परिसरातील 62 अनधिकृत बांधकामे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत, अशी माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
पालिकेच्या परिमंडळ – 5 चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘एम पूर्व’ विभागाद्वारे ‘कुर्ला स्क्रॅप’ परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पालिकेचे 35 कामगार – कर्मचारी – अधिकारी सहभागी झाले होते.
तसेच या कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या 25 पोलीस कर्मचारी – अधिकारी यांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. मुंबई पोलिसांच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आलेल्या या पाडकाम कारवाईदरम्यान 2 जेसीबी, 4 डंपर, 1 पोकलेन यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री देखील वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More