माद्रिद स्पर्धेत फेडरर पाठोपाठ नादाल देखील पराभूत – eNavakal
News क्रीडा विदेश

माद्रिद स्पर्धेत फेडरर पाठोपाठ नादाल देखील पराभूत

माद्रिद – रॉजर फेडरर पाठोपाठ 5 वेळा माद्रिद आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा जिंकणार्‍या राफेल नादालला यंदा मात्र स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत स्टेफानोस सिटसिपासने राफेल नादालचा 3 सेटमध्ये सनसनाटी पराभव केला. पहिला सेट जिंकून ग्रीसच्या या खेळाडूंनी सामन्यास जोरदार सुरुवात केली.
पण दुसर्‍या सेटमध्ये नादालने तो सेट जिंकून बरोबरी साधली. पुन्हा तिसर्‍या सेटमध्ये सेटानोसने शानदार खेळ करून सामन्यात जोरदार कमबॅक केले सेट आणि सामना खिशात टाकला. 20 वर्षीय सेटानोसने चौथ्यांदा मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता त्याचा मुकाबला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोव्हिचशी होईल. या अगोदर उपांत्य फेरीच्या लढतीत रॉजर फेडररला देखील हार खावी लागली. डॉमनिक थिएमने रॉजरला पराभूत केले होते. दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने थिएमला चुरशीच्या लढतीत 2 सेटमध्ये नमवले. जोकोने ही लढत 7-6, 7-6 अशी जिंकली. दोन्ही सेट जोकोने टायब्रेकवर जिंकले. सामना जिंकण्यासाठी जोकोला जोरदार संघर्ष करावा लागला. जोकोने या अगोदर 2 वेळा ही स्पर्धा जिंकली. यंदाच्या नव्या मोसमात क्ले कोर्टवर नादालाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. या अगोदर मॉर्टो कार्लो बार्सिलोना या स्पर्धेत देखील लवकर पराभव पत्करावा लागला. आता फेडरर नादालच्या गैरहजरीत जोकोव्हिचला तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. तरी देखील स्टेेफानोसकडून जोरदार झुंज मिळण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले आहेत. राजधानी दिल्ली पेट्रोलचे दर प्रतिलिटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More