मादक पदार्थांची राजधानी – eNavakal
लेख

मादक पदार्थांची राजधानी

अलिकडे नाशिक येथील पोलिसांनी मुंबईत येऊन तब्बल 44 लाख किंमतीचे मादक पदार्थ जप्त केले. महिनाभरापूर्वी दोन आफ्रिकन लोकांकडून दोन कोटींची नशिली पावडर जप्त केली होती. तर गेल्याच आठवड्यात दक्षिण अफ्रिकेतून संशयास्पदरित्या आलेली वनस्पतींची पाने हीसुध्दा अशीच मादकपदार्थांसाठी वापरली जाणार असल्याचे आढळून आले होते. विमानतळावर असे मादक पदार्थ जप्त करण्याच्या लागोपाठ घटना घडल्या आहेत. आणि आता नाशिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईत येऊन हे मादक पदार्थ जप्त करावे. यावरून मुंबई ही कशी मादक पदाथार्ंची बाजारपेठ होत आहे हे सिध्द होते. बाहेरच्या देशातून येणारे आणि देशातल्याच इतर प्रांतांमधून मुंबईकडे येणार्‍या या मादकपदार्थांचा ओघ बघितल्यानंतर गेल्या वर्षदोन वर्षामध्ये हा व्यापार आणि त्यातकाम करणारी ड्रग माफियांची टोळी अधिक सक्रीय झालेली दिसून येते. अर्थात दोन वर्षापूर्वी मुंबईतल्या एका प्रसिध्द अभिनेत्रीचा या ड्रग व्यावसायिकाशी असलेला संबंध उघड झाल्यानंतर कसे उच्चभ्रू लोक सहभागी होतात. यावर प्रकाश पडतो. आणि आठ महिन्यापासून पश्चिम उपनगरातील अंधेरी, जुहू, वर्सोवा, लोखंडवाला काँप्लेक्स या परिसरातील शाळांच्या परिसरात मादक पदार्थ विकणार्‍यांची वर्दळ सुरु झाल्याचे आढळून आले. त्या विरोधात या शाळांच्या पालकांनी एकत्र येऊन आंदोलने केली आहेत. या सगळ्या घटना मुंबईला मादक पदार्थांची राजधानी बनवण्याचे कारस्थान वाटू लागते. पोलिसदलामध्ये अशा प्रकारांवर सक्ती करण्याकरीता स्वतंत्र पोलिस पथक काम करीत असते. परंतु त्या माफिया टोळीतला प्रचार आणि प्रसार पाहिल्यानंतर पोलिस दलातील या पथकाला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता वाटू लागते. गुप्तचर यंत्रणा याचकरीता प्रभावी असणे गरजेचे ठरते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More