माणिकपूर पोलिसांची शहरातील हातगाड्यांवर कारवाई! शेकडो हातगाड्यांवर गॅस सिलिंडर्स! तरीही कारवाई दोघांवरच? – eNavakal
News महाराष्ट्र

माणिकपूर पोलिसांची शहरातील हातगाड्यांवर कारवाई! शेकडो हातगाड्यांवर गॅस सिलिंडर्स! तरीही कारवाई दोघांवरच?

वसई- नवघर माणिकपूर शहरांत पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मर्जीने सर्रास सुरू असलेल्या खाद्यपदार्थ बनविणार्‍या हातगाड्यांवर माणिकपूर पोलिसांनी आपला कारवाईचा बडगा उगारला असून शहरांत शेकडो हातगाड्यांवर सिलिंडर्सचा वापर होत असताना केवळ दोघावरच फौजदारी कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे,

दरम्यान, काल अचानक पणे माणिकपूर पोलिसांनी वर्तक महाविद्यालयाच्या समोर असलेली एक वडापाव ची हातगाडी आणि साईनगर विभागातील एक जिलेबी विक्री करणार्‍या अशा दोघा इसमावर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एकूणच नवघर माणिकपूर शहरांत खाद्यपदार्थ बनविणार्‍या शेकडो हातगाड्यावर गॅस सिलिंडर्सचा सर्रास वापर होत असताना माणिकपूर पोलिसांनी केवळ दोनच हातगाडी चालकावर कारवाई केल्याने पोलिसांच्या या कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More