माणदेशी महोत्सवाला दणक्यात सुरुवात – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

माणदेशी महोत्सवाला दणक्यात सुरुवात

मुंबई – अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव देणाऱ्या माणदेशी महोत्सवाची सुरुवात झाली असून १२ जानेवारी या महोत्सवाचा आनंद रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात घेता येणार आहे. माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डाऊचे सीईओ सुधीर शेणॉय, एचएसबीसीचे सीईओ रोशा, माणदेशी महिला बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरुवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे. मुंबईकरांना या महोत्सवामध्ये माणदेशीची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य खरेदी करता येणार आहेत. तसेच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या वर्षी माणदेशी महोत्सवात १०० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. यासोबत हाताने मडकं तयार करा, स्वत: उभं राहून लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, हे सारं काही गावातलं येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, भातवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे तुमच्या प्रतिक्षेत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनचा फज्जा, चौपाटीवर नागरिकांची गर्दी

भाईंदर – ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहतील, गर्दी करू नका’, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. तरीही अनेक ठिकाणी भाजीपाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘भारताने मदत केली तर ठीक, अन्यथा…’

न्यूयॉर्क – बलाढ्य अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मदतीची...
Read More
post-image
महाराष्ट्र

भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टनेल! एपीएमसीचा निर्णय

नवी मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट निर्जंतुक करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावर आजपासून सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले आहे,...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने ५ वाजल्यानंतर बंद

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरातील मेडिकल आणि दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ५ ते सायंकाळी ५ यावेळेतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

जसलोकमध्ये कोरोनाचा प्रवेश! 5 नर्स, 12 कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील आणि खास करून मुंबईतील रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. असे...
Read More