माणगावमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा! हायकोर्टाचे राज्य सरकार आणि प्राधिकरणाला आदेश – eNavakal
News मुंबई

माणगावमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा! हायकोर्टाचे राज्य सरकार आणि प्राधिकरणाला आदेश

मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावलगत उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (जिल्हा विभाग) ला दिला. राज्य सरकार आणि संबंधीत प्राधिकरणांमध्ये समन्वय नसल्यानेच अशी बांधकामे उभी राहतात, असे मत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने व्यक्त करताना कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या जागेवर बांधकाम करणार्‍यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे पावणे दोन किमीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात केलेल्या बेकायदा बांधकामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो, असे निरीक्षण नोंदवणारी जनहित याचिका वैभव साबळे यांच्यावतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी 2014 मध्ये दाखल केली होती. तर ही बांधकामे अधिकृत करण्यात यावीत यासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्तींनी या याचिकेची गंभीर दखल घेतली. राज्य सरकार आणि संबंधीत प्राधिकरणांमध्ये समन्वय नसल्यानेच असे प्रकार घडतात, असे मत व्यक्त करून सरकारसह नॅशनल हायवे ऑथोरिटीला धारेवर धरले. या बेकायदा बांधकामांमुळे गाड्यांचा वेग मंदावला असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा विपरित परीणाम होत असल्याने संबंधीत बांधकामे लवकरात लवकर हटवा आणि पुन्हा उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्या, असा आदेश न्यायालयाने दिला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More