माझ्या प्रश्‍नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत! राहुल गांधींंनी लगावला टोला – eNavakal
देश राजकीय

माझ्या प्रश्‍नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत! राहुल गांधींंनी लगावला टोला

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांमध्ये प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ही अभूतपूर्व घटना आहे. त्यांनी आधी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. लोकसभा निवडणूक निकालांच्या 4 ते 5 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत असल्याबद्दल राहुल गांधी यांनी आश्‍चर्यही व्यक्त केले. काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
नोटाबंदी, राफेल घोटाळा, जीएसटी, बेरोजगारी, अनिल अंबानी याप्रकरणी मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची पंतप्रधान मोदी यांनी उत्तरे द्यावीत. पंतप्रधान मोदी यांची विचारसरणी महात्मा गांधींनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाची नसून, हिंसेची आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.  पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक आयोगाने काम केले. निवडणूक आयोगाने पक्षपाती केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर कितीही टीका केली, नकारात्मक गोष्टी पसरवल्या, तरी मी केवळ त्यांना प्रेम देत राहीन. पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही राजकारणात नाही. मी त्यांच्याबाबत काहीही बोलणार नाही. मात्र, त्यांना जर माझ्या कुटुंबियांबद्दल बोलायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडे पैशाची कमतरता नाही. त्यांच्याकडे पैसा असला, तरी आमच्याकडे सत्य आहे आणि सत्याचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी चांगले काम केले. भाजपकडून केला जाणार भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर आणला. अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोंडीत पकडले. 23 मे रोजी जाहीर होणार्‍या निकालानंतर कोणाची सत्ता स्थापन होईल, याचे चित्र स्पष्ट होईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More