माझ्यासाठी प्रार्थना करा! रुग्णालयात जाण्यापूर्वी भावुक झाला संजय – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

माझ्यासाठी प्रार्थना करा! रुग्णालयात जाण्यापूर्वी भावुक झाला संजय

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो आपल्या वांद्रे येथील घरातून रुग्णालयात जाण्यास निघाला. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता दत्त आणि बहिण प्रिया व नम्रता होत्या. यावेळी पत्रकार आणि छायाचित्रकारांनी संजयला तब्येतीविषयी विचारणा केली असता ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असे भावुक आवाहन त्याने केले. त्याचे हे शब्द ऐकूण मान्यता दत्तदेखील भावुक झाली आणि तिने संजयला ‘जादू की झप्पी’ दिली.

मान्यता दत्तने मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध करून संजय त्याच्या आजारासाठीचे सर्व प्राथमिक उपचार मुंबईतच करणार असल्याचे सांगितले. ‘आम्ही त्याचे (संजय दत्तचे) प्राथमिक उपचार मुंबईतच करणार आहोत. पुढील बेत हे कोविड 19 बाबतची एकंदर परिस्थिती पाहून आखण्यात येतील. सध्याच्या घडीला कोकिलाबेन रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टर संजूची काळजी घेत आहेत, त्याच्यावर उपचार करत आहेत’, असे मान्यता म्हणाली. त्याचबरोबर संजय दत्तच्या आजाराबाबत, कर्करोग ज्या टप्प्यात आहे त्याबाबत तर्कवितर्क लावणे थांबवा आणि डॉक्टरांना त्यांचे काम करुद्या, अशी विनंतीही तिने सर्वांना केली आहे. शिवाय संजूबाबाच्या तब्येतीबाबतची सर्व माहिती वेळोवेळी आपण देत राहू याची हमीही तिने दिली.

दरम्यान, संजय दत्तला ८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्यात पाणी जमा झाल्याने त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह निगेटिव्ह आली होती. त्यानंतर संजय दत्तला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती 11 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा समोर आली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंहा आत्महत्या प्रकरणाचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ६४,५३१ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख ६७ हजार २७४ वर

नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल ६४ हजार ५३१ नव्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

माझ्यासाठी प्रार्थना करा! रुग्णालयात जाण्यापूर्वी भावुक झाला संजय

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो आपल्या वांद्रे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. या पावसामुळे कोल्हापूरसह...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ९३१, पुण्यात २,५४३ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात ११ हजार ११९ नवे कोरोना रुग्ण...
Read More