माजी सैनिक रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती पदक देण्यात येण्याची मागणी – eNavakal
News महाराष्ट्र

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती पदक देण्यात येण्याची मागणी

जुन्नर – स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक रेस्क्यू टीम मध्ये महत्त्वाचे काम करणाऱ्या माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरी पाहता राष्ट्रपती पदक देण्यात येण्याची मागणी माजी सैनिक संघटना जुन्नर च्या वतीने काका जोगळेकर यांनी जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे जुन्नर येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी केली यावेळी आमदार सोनवणे यांनी देखील याबाबत शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले .
आज प्रजासत्ताक दिना निमित्ताने नवाकाळ बातमीचा सकारात्मक प्रतिसाद जुन्नर तालुक्यात दिसून आला. नवाकाळने 12 जानेवारी रोजी अनेकांचा जीव वाचवून देवदूत ठरणाऱ्या माजी सैनिक रमेश खरमाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक ही बातमी प्रसिद्ध केली होती.
जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक खरमाळे रमेश गणपत यांनी सैनिकी सेवा निवृत्ती नंतर जुन्नर तालुक्यात माळशेज घाट एस टी दुर्घटनेत 27 जनांचा मृत्यु, किल्ले हडसरवर रात्री अडकलेल्या पुण्यातील सोळा पर्यटकांची सुखरूप सुटका, बेल्हे येथील एकाच कुटुंबातील 70 फुट खोल विहीरीतून मृत 3 व्यक्तींना बाहेर काढणे, पिंपळवंडी येथील मिना नदीच्या आलेल्या पुरातुन एकाच कुटुंबातील तीन व्यक्तिंना रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून दिलेले जीवदान, जुन्नरच्या बाराबावडीत पडलेल्या मुलाचा मृतदेह शोधण्याचा, किल्ले जीवधनच्या वानरलिंगिवरून 200 फूट दरीत कोसळलेल्या भोरच्या पर्यटकास जीव धोक्यात घालून रेस्क्यूद्वारे दिलेले जीवदान व किल्ले जीवधनवर घसरून पडलेल्या पुण्याच्या पर्यटकास सुखरूप खाली आनुन दिलेली मदत अशी जीवनदान दायी कामे केली शिवाय अनेक पक्षी, अनेक बिबटे, सांबर व तरस अशा प्राण्याला रेस्क्यू करून दिलेली जीवदान याबाबत पुरस्कार देण्यात यावा अशी जनतेची मागणी केली होती. खरमाळे यांनी फक्त हेच कार्य केले नसुन त्यांनी कोमात गेलेल्या दीड वर्षाच्या बाळासाठी साडे तीन लाख तर नऊ वर्षांच्या मुलीच्या ह्रदय प्रत्यारोपन शस्रक्रियेसाठी तीच्या वडीलांना फेसबूक पेज व्दारे दहा लाख पंचावन हजाराचा निधी मिळवून दिला आहे. अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे त्यांनी प्रतिनिधीत्व करून “शिवाजी ट्रेल” या किल्ले संवर्धन संस्थेच्या माध्यमातून गडकोट किल्यांच्या संवर्धनात मोठा सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीचा विचार करता आज त्यांना राष्ट्रपती पदक देण्यात यावे यासाठी जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने श्री. काका जोगळेकर यांनी आमदार शरददादा सोनवणे यांना झेंडा वंदनानंतर सभेत तोंडी निवेदन दिले. आमदार शरददादा सोनवणे यांनी ते मान्य करत माजी सैनिक रामदास मेहेर, रविंद्र लगड, विरणारी अनिता येंधे व लताबाई घनकुटे समक्ष प्रथम त्यांना येत्या शिवजयंतीला “शिवनेरी भुषण पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे व त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार शरददादा सोनवणे, तहसिलदार किरण काकडे, यांच्या हस्ते माजी सैनिक विरणारी अनिता येंधे व माजी सैनिक रमेश खरमाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती बीडीओ सतीश गाढवे जुन्नर नगरपालिका नगराध्यक्ष शाम पांडे , अतुल बेनके, अलकाताई फुलपगार, कृषी अधिकारी हिरामण शेवाळे जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घोडके नगरपालिका मुख्याधिकारी जयश्री काटकर आदि उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

12 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचे राज्यभरात मूक मोर्चे

मुंबई – राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या हिताविरोधात काही जाचक शासन निर्णय घेतले आहेत. काहींचे अध्यादेश काढले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे सोयीनुसार माथाडी कायद्याची तोडफोड...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More