माजी मंत्री गणेश नाईक मंदिर कारवाईबाबत पुन्हा अडचणीत – eNavakal
News न्यायालय मुंबई राजकीय

माजी मंत्री गणेश नाईक मंदिर कारवाईबाबत पुन्हा अडचणीत

मुंबई- एमआयडीसीमधील बावखलेश्वर मंदिरावरील कारवाईला स्थगिती दिली असताना उच्च न्यायालयात पुन्हा या मंदिराबाबत त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. हे मंदिर नियमित करून कारवाई टाळण्याची विनंती करण्यात आली होती. यासाठी एमआयडीसी प्रशासनाने अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे धोरण शासकीय पातळीवर केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र या धोरणाची माहिती द्या अन्यथा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने आता एमआयडीसी प्रशासन अडचणीत आले आहे. सोमवारी पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानंतर आता तरी मंदिरावर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  न्यायालयाच्या आदेशानंतर एमआयडीसी कारवाईबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. ठाणे-बेलापूर भागातील औद्योगिक वसाहतीमधील  (टीटीसी) अनेक बेकायदा बांधकामे तोडण्यात आल्यानंतर एमआयडीसीच्या सुमारे अकराशे चौ. मी. भूखंडावरील बावखळेश्वर मंदिर व मंदिर ट्रस्टच्या ऑफिसवरील कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी नुकताच आदेश देऊन हे मंदिर व ट्रस्ट ऑफिससह इतर सर्व बांधकामे राज्य सरकार व एमआयडीसीने पोलीस बळाची मदत घेऊन पाडण्यास सांगितले होते. मात्र मंदिर ट्रस्टने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. यानंतर याबाबत धोरण आणायचे निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट करत एमआयडीसीकडून कारवाई थांबवण्यात आली होती. अखेरीस याविरोधात कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने एकदा पुन्हा माजी मंत्री गणेश नाईक चर्चेत आले आहेत. औद्योगिक वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण करून बावखळेश्वर, गणेश व महाकाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय परिसरामध्ये तलावाचे सुशोभीकरण, नारळाची बाग व कार्यालय उभारण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी 2013 मध्ये याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo यशराज फिल्म्सच्या उपाध्यक्षकाची पदावरून हकालपट्टी

मुंबई – #MeToo मोहिमेंतर्गत यशराज फिल्म्सचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांना पदावरून काढण्यात आले आहे. एका महिलेने आशिष पाटीलवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पाटील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More