माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने गेले २ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल अखेर वयाच्या 85व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

‘आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकरपंत परिचारक यांचे काल रात्री साडे अकराच्या (11.35 PM) सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दुःखद निधन झाले. गेले 2 दिवस ते ventilatory support (कृत्रिम श्वासोश्वास) वर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील. सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या त्यांच्या व्यापक कुटुंबाला, जनसामान्यांना हे दुःख पचवण्याची ईश्वर ताकद देवो, त्यांचा जनसेवेचा यज्ञ असाच पुढे चालू ठेवुयात’, अशी फेसबुक पोस्ट त्यांचे नातू प्रतिश प्रशांत यांनी आज सकाळी केली आहे.

नमस्कार, आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल…

Posted by Pritish Prashant Paricharak on Monday, August 17, 2020

दरम्यान, परिचारक यांनी 25 वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. २०१९ सालची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More