माजी आमदार मंगेश सांगळेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल – eNavakal
News

माजी आमदार मंगेश सांगळेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई- ऐरोली येथील यश पॅरेडाईज या आलिशान इमारतीमध्ये विक्रोळी विधानसभेचे माजी आमदार मंगेश सांगळे वास्तव्यास आहेत. त्यांनी याच इमारतीत वास्तव्यास असलेल्या 19 वर्षीय युवतीला आपल्या घरात बोलवून विनयभंग केल्याची घटना घडली असून त्यांच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सांगळे यांना अद्याप अटक झालेली नाही. सांगळे हे म्हाडा संचालक असून भाजपमध्ये कार्यरत आहेत.
ऐरोली सेक्टर आठमधील यश पॅरेडाईज या आलिशान इमारतीमध्ये म्हाडाचे संचालक माजी आमदार मंगेश सांगळे सहा वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांनी याच इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या युवतीशी ओळखीचा फायदा घेवून अश्लील चाळे केले. काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर त्या युवतीच्या पालकांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र मंगेश सांगळे यांच्याभोवती राजकीय वलय असल्याने त्यांना पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. दरम्यान, या युवतीच्या परिवाराशी असलेल्या संबंधांचा गैरफायदा माजी आमदार सांगळे यांनी घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याच इमारतीमध्ये राजकीय व इतर क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती वास्तव्यास आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More