माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाची मालमत्ता जप्त – eNavakal
Uncategoriz

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची ५४ कोटी रुपयांची मालमत्ता आज ईडीने जप्त केली आहे. तसेच कार्तीच्या इंग्लंड, स्पेन आणि ऊटीतील बंगल्यांला इडीने टाळे ठोकले आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तीची कंपनी आयएनक्स मीडिया हाऊसला अवैध रीतीने पैसा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने तपास केला असता बऱ्याच अवैध व्यवहारांची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी सीबीआयने कार्तीविरूद्ध एफआयआरही दाखल केली आहे. या एफआयआरच्या माध्यमातून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे. जप्त झालेली ५४ कोटींची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहे. यामध्ये, उटी, कोडाइकेनलचे बंगले, स्पेनच्या बार्सीलोनातील टेनिस क्लब, इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस,  चेन्नईच्या बँकेतील ९० लाखांचे फिक्स्ड डिपॉझिट, दिल्लीच्या जोरबाघ परिसरातील आलिशान फ्लॅट या मालमत्तेचा समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार

श्रीहरीकोटा – भारताच्या बहुप्रतिक्षीत ‘चांद्रयान 2’ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात...
Read More
post-image
मुंबई

प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन

मुंबई – दादरमधील सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे बुधवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९९८ मध्ये त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणून मान देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा अहवाल स्वीकारला असून या प्रकरणावर तोडगा...
Read More
post-image
महाराष्ट्र

हुतात्मा समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई यांचे निधन

सांगली – जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई नागनाथ नायकवडी (वय 88) यांचे काल रात्री...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे काका सुपरस्टार राजेश खन्ना

‘काका’ अशी ओळख असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मा. राजेश खन्ना यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. जतीन खन्ना हे राजेश खन्ना यांचे...
Read More