माघी एकादशी यात्रा सुरू; २ लाख वारकरी पंढरीत – eNavakal
महाराष्ट्र

माघी एकादशी यात्रा सुरू; २ लाख वारकरी पंढरीत

पंढरपूर – पंढरपुरला वर्षातून चार मोठ्या यात्रा भरत असतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यापैकी माघी एकादशीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.

शनिवार 16 फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा मुख्य दिवस आहे. कर्नाटक, सीमावर्ती भाग, कोकण, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य वारकरी भाविक या यात्रेला मोठ्या संख्येने येत असतात. हजारो वारकरी भाविक मजल दरमजल करीत पंढरीच्या वाटेवर आहेत. मंदिर समितीने दर्शनासाठी रांगेत उभे राहाणार्‍या भाविकांसाठी निवारा शेड उभी केली आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे जातीने लक्ष
ठेवून आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More