मांडूळ तस्करीप्रकरणी मालखेडात दोघांना अटक – eNavakal
News महाराष्ट्र

मांडूळ तस्करीप्रकरणी मालखेडात दोघांना अटक

कराड- मालखेड ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या समोर मोकळ्या जागेत मांडुळाची तस्करी करणार्‍या दोघांना कराड ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. ही कारवाई आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी असा सुमारे तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पांडुरंग भगवान शिंदे (34), जयवंत शंकर ताटे (33) अशी मांडूळ तस्करीप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
मालखेड ता. कराड गावच्या हद्दीत सम्राट लॉजच्या परिसरात दोघेजण मांडूळ सापाची तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. बातमीदाराच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे हे गाडीवरून तेथे आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी उघडून पाहता त्यामध्ये एक डबा होता. त्याचे झाकण उघडून पाहिले असता त्यामध्ये एक काळपट रंगाचे सुमारे तीस लाख रूपये किमतीचे 64 सेमी लांबीचे व 8 सेमी जाडीचे मांडूळ जातीचा साप विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता लोक धनदौलत वाढावी या अंधश्रद्धेपोटी मोठ्य किमतीला मांडूळ खरेदी करतात असे दोघा संशयितांनी सांगितले. सदर प्रकरणी पोलिसांनी पांडुरंग शिंदे व जयवंत ताटे या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली. ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More