मांगीतुंगी येथे २२ ऑक्टोबरपासून जागतिक अंहिसा संमेलन; राष्ट्रपती, राज्यपाल यांची उपस्थिती – eNavakal
महाराष्ट्र

मांगीतुंगी येथे २२ ऑक्टोबरपासून जागतिक अंहिसा संमेलन; राष्ट्रपती, राज्यपाल यांची उपस्थिती

नाशिक – विश्वात शांतता नांदावी यासाठी जैन समाजाचे तिर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे तिन दिवस जागतिक अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून संमेलनाला प्रारंभ होणार असून संमेलनाचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती कोंविद प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. प्रशासनाने राष्ट्रपतीच्या हेलिकॉप्टरसाठी मांगीतुंगी परिसरात बारा एकर जागा अधिग्रहित केली आहे. या संमेलनासाठी देशातूनच नव्हे तर जगातून भाविक येणार असल्याने अवघे प्रशासन सतर्क झाले आहे.

मांगीतुंगी हे जैन समाजाचे प्रख्यात धार्मिक क्षेत्र असून या ठिकाणी भगवान ऋषभदेव यांची तब्बल १०८ फुट उंचीची भव्य मुर्ती आहे. ऋषभदेवांच्या चरणी लिन होण्यासाठी देशभरातून रोज हजारो भाविक मांगीतुंगी येथे येत असतात. या धार्मिक क्षेत्रातून भाविकांना अंहिसेचे धडे दिले जातात. यातूनच विश्वास शांतता नांदावी यासाठी आता येथील जैन समाज समितीने तिन दिवंसासाठी जागतिक अंहिसा संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनास राष्ट्रपती रामनाथ कोंविद, राज्यपाल पी.विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरिष महाजन उपस्थित राहणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More