महिलादिनी रा.काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचे शासनविरोधात मूक आंदोलन – eNavakal
आंदोलन मुंबई

महिलादिनी रा.काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचे शासनविरोधात मूक आंदोलन

मुंबई – आज जागतिक महिलादिन सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे मुंबई येथे मंत्रालयाच्या येथे  महात्मा गांधींच्या पुतळ्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने राज्यात महिलांवरचे वाढते अत्याचाराच्या विरोधात राज्यशासनाचा मूकपने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनमध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची  उपस्थिती होती.
या मूक मोर्चामध्ये वेगवेगळ्या नामफलक हातात घेऊन मूकपणे  राष्ट्रवादीकाँग्रेसच्या  महिला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यामध्ये महिलांविरोधात अत्याचार बंद करा, लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार असे फलक हातात घेऊन राज्यशासनाच्या निषेध करण्यात आला.दरम्यान मूक मोर्चा संपन्न झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटल्या की, राज्यात आज देखील महिला सुरक्षित नाहीये. महिलांवरील अत्याचारात २० टक्क्याने वाढ झाली आहे. तसेच राज्यात मुलींच्या जन्म संख्येत देखील घट होत असून यावर शासन केवळ हातावर हात ठेऊन बसून आहे यासंदर्भात काहीच ठोस कार्यवाई होताना दिसत नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान हे हा मोर्चा पायी विधान भावनाकडे जाताना रस्त्यायात चित्रा वाघ आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More