महिलांनो…अखेर आज लोकल तुमच्या सेवेत हजर होणार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

महिलांनो…अखेर आज लोकल तुमच्या सेवेत हजर होणार

मुंबई – अखेर आजपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत महिला प्रवास करू शकतील, अशी माहिती रेल्वमंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे आता सर्वसामान्य महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. परंतु पुरुष प्रवासी मात्र अद्याप लोकलच्या प्रतीक्षेतच आहेत.

अनलॉकच्या प्रक्रियेत सर्व आस्थापने सुरू होत असल्याने महिला नोकरदारवर्गही कामावर जाण्यास लागला आहे. परंतु त्यांचा अर्धा वेळ प्रवासातच जात असल्याने निदान महिलांकरता तरी लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला केली होती. शुक्रवारी संध्याकाळी ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुभा दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. त्यामुळे सरसकट महिलांना लोकलचा प्रवास करता आलाच नाही.

त्यानंतर रेल्वेने कोणतीही पावलं उचलली नाहीत म्हणून राज्य सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा पत्र पाठवले होते. मग अखेर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून रेल्वे प्रवासाची मुभा दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL 2020 : शिखरची शतकी खेळी व्यर्थ; पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय

दुबई – काल रंगलेल्या आयपीएल सामन्यात निकोलस पुरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार पराभव केला. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,090, पुण्यात 745 नवे रुग्ण! महाराष्ट्राने 16 लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. मंगळवारी आढळलेल्या 8 हजार 151 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

महिलांनो…अखेर आज लोकल तुमच्या सेवेत हजर होणार

मुंबई – अखेर आजपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षाला 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

बीड – भ्रष्टाचाराच्या प्रकारणात मागील 2 वर्षांपासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने राहत्या घरीच...
Read More
post-image
News देश

रात्री मदत मागणार्‍या दारू तस्करावर वरुण गांधी भडकले! मी तुझ्या बापाचा नौकर नाही,असे खडसावले!

पिलभित (उत्तर प्रदेश) – गुन्हेगारी म्हणजे उत्तर प्रदेश असे समीकरणच बनले आहे. तसेच गुन्हेगारांना राजकारणी पुढार्‍यांनी वाचवायचे असा पायंडाच उत्तर प्रदेशात पडला आहे. हाच धडा...
Read More