महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानावर चाकूने हल्ला – eNavakal
News गुन्हे मुंबई

महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानावर चाकूने हल्ला

मुंबई- महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानावर संशयित आरोपीने चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी दिवसाढवळ्या बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. या हल्ल्यात सुमीत कांरडे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांचे तीन ते चार विशेष पथक विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांसह पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुमीत कारंडे हे बोरिवली परिसरात राहत असून सध्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक सध्या बोरिवली रेल्वे स्थानकात आहे. गुरुवारी सकाळी ते रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावित होते, यावेळी एक तरुण फलाट क्रमांक सहा आणि सातवर संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याला बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. ब्रिजवरुन जात असताना अचानक या आरोपीने त्यांच्या हातावर फटका मारुन त्यांच्याकडील चाकूने त्यांच्या पोटात आणि हातावर वार केले होते, त्यात सुमीत हे गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. दिवसाढवळ्या बोरिवली रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेने रेल्वे पोलीस आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांचे तीन ते चार पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाला मुंबईसह बाहेर पाठविण्यात आले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा मुंबईत दाखल; गोरेगावमध्ये सभेचे आयोजन

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More