महाराष्ट्र विद्यापीठाची निवडणुकीची प्रक्रीया २८ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत वाढविली – eNavakal
निवडणूक मुंबई

महाराष्ट्र विद्यापीठाची निवडणुकीची प्रक्रीया २८ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत वाढविली

मुंबई – महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ , १ मार्च २०१७ पासून महाराष्ट्रात लागू झाला. विविध विद्यापीठांमध्ये सध्या अधिकार मंडळांच्या निवडणूक प्रक्रीया सुरु आहेत. या निवडणुकां संदर्भातील काही कलमांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी तसेच मुदत वाढविण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३० (४) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी व नोंदणीकृत पदवीधर गटातून प्रत्येकी एक उमेदवार आरक्षण संवर्गातून निवडून द्यायचा आहे. या आरक्षण संवर्गातून सर्व संवर्गाना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी पहिल्या पंचवार्षिक निवडणूकीत चिठ्ठी सोडत पध्दतीचा अवलंब करण्याचा अधिकार विद्यापीठाचे कुलगुरु यांना देण्याबाबत दुरुस्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांच्या निवडणूका, नामनिर्देशने व स्वीकृतीची प्रक्रीया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि, काही विद्यापीठांनी याबाबतची कार्यवाही केली नसल्यामूळे ही मुदत दि. २८ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सर्वच विद्यापीठांमध्ये विविध अधिकार मंडळांच्या निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत या वर्षी बराच कालावधी जाईल, यानंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका घेणे हे शक्य होणार नाही. यामुळे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका पुर्वीप्रमाणेच घेण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०९ मध्ये विद्यापीठांनी बृहत आराखडे तयार करुन त्यास शासनामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) मान्यता घेण्याची तरतूद आहे. माहेडने बृहद आराखड्यांची सखोल तपासणी  करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली. या समितीने अहवाल माहेडला अहवाल सादर केला.  तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या शिफारशी माहेडने मंजूर केल्या. या शिफारशींप्रमाणे नव्याने जाहिरात देवून महाविद्यालयाचे प्रस्ताव मागविणे व त्या अनुषंगाने नवीन महाविद्यालये/परिसंस्थाबाबतच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More