महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना आजमगड सीमा भागात उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले. नितीन राऊत यांना आजमगडमध्ये येण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला. आजमगड येथे सीमेवर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर तिथेच रस्त्यावर राऊत यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून होते.यावेळी बसगावला जाऊ द्यावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांनी केली.

बसगाव येथे दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबीयांना भेटायला नितीन राऊत उत्तरप्रदेश येथे गेले आहेत. नितीन राऊत यांचा ताफा अडवल्यामुळे युपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

उत्तर प्रदेशातील आझमगडमधील बांसगावमध्ये एका मागास समुदायातील सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या सरपंचाची हत्या ही उच्च जातीतील व्यक्तींनी केली आहे. ४२ वर्षीय सत्यमेव जयते असे या बांसगावच्या सरपंचांचे नाव आहे. जयते यांनी ठाकूर समाजातील व्यक्तीला वाकून नमस्कार केला नाही, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली

आजमगड – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ताफा अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी जागेवरच...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

आर्टिस्ट आणि फोटोग्राफर राम कामत यांची आत्महत्या

मुंबई – लोकप्रिय आर्टिस्ट आणि छायाचित्रकार राम इंद्रनील कामत यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. ४१ वर्षांच्या राम कामत यांचा बाथटबमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र वाहतूक

आंतरजिल्हा प्रवासासाठी लालपरी डेपोतून निघाली

मुंबई – जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. मार्चच्या अखेरीस पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर एसटीची चाकेही थांबली होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात विहिरीत गुदमरून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर – सर्वत्र तान्ह्या पोळ्याचा आनंदोत्सव सुरू असताना शेतामधील विहिरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तीन मजुरांचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ६९ हजार ६५२ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर

नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९ हजार ६५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद...
Read More