महाराष्ट्र केसरी किताबासाठी हर्षवर्धन-शैलेश यांच्यात मुकाबला – eNavakal
News महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी किताबासाठी हर्षवर्धन-शैलेश यांच्यात मुकाबला

पुणे – मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी उद्या नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगिर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात मुकाबला रंगणार आहे. हे दोघे अंतिम फेरीत आमने-सामने असल्यामुळे महाराष्ट्राला उद्या नवीन महाराष्ट्र केसरी मिळणार आहे. त्याअगोदर गतविजेत्या बाला रफिक शेखला उपांत्य फेरीत आणि माजी विजेत्या अभिजीत कटकेला गादी विभागाच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
विशेष म्हणजे हर्षवर्धन-शैलेश हे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय पेहलवान अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचेच शिष्य आहेत. गादी विभागातून हर्षवर्धनने तर माती विभागातून शैलेश शेळकेने विजय मिळवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत शैलेशन रोमहर्षक लढतीत जमदाडेला 11-10 गुणांनी नमविले. तर हर्षवर्धनने अभिजीतला 5-2 गुणांनी सहज पराभूत केले. शेळके-जमदाडे यांची लढत चांगली रंगली. अटीतटीच्या या लढतीत शेवटच्या सेकंदापर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. गादी विभागात अंतिम फेरीच्या सामन्यात माजी विजेत्या पुणे शहरच्या अभिजीत कटकेला पराभूत करून हर्षवर्धनने आपला अंतिम फेरीतील केसरी गटाचा प्रवेश पक्‍का केला. तर त्याअगोदर अभिजीतने लातूरच्या सागर बिराजदारला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. माती विभागात उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलापूरच्या ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली जमदाडेने गतविजेत्या बुलढाण्याच्या बाला रफिक शेखला अवघ्या 2 मिनिटांत चितपट करून स्पर्धेत मोठ्या धक्‍कादायक विजयाची नोंद केली. हप्‍ते डावावर माऊलीने बालाला अस्मान दाखविले.
दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात शैलेश शेळकेने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला गुणांवर पराभूत केले. बालाला पराभूत करणार्‍या माऊलीला मात्र शैलेश शेळकेविरुद्धच्या लढतीत हार खावी लागली. त्यामुळे केसरी गटाची अंतिम फेरी गाठण्याचे माऊलीचे स्वप्न भंग पावले. हर्षवर्धन ग्रीको रोमन प्रकारातील अनुभवी खेळाडू आहेत. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा त्याला खूप फायदा झाला. मूळचा अकोल्याचा असलेला हर्षवर्धन बलकवडे व्यायामशाळेत प्रशिक्षण घेत आहे. काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो कसून सराव करतो. त्याअगोदर गादी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सचिन येलभरने प्रवीण सरकला, हर्षवर्धनने संग्राम पाटीलला, सागर बिराजदारने आदर्श गुंडला आणि अभिजीत कटकेने अक्षय मंगवडेला पराभूत केले. तर माती गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शैलेशने संतोष दोरवडला, ज्ञानेश्‍वर जमदाडेने संदीप काळेला, बाला शेखने तानाजी झुजूरकेला आणि गणेश जगतापने सिकंदर शेखला नमविले. उद्या सायंकाळी 5 वाजता अंतिम फेरीचा महाराष्ट्र केसरीसाठीचा सामना होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

हत्या व बलात्काराचे गुन्हे तब्बल ९० टक्क्यांनी घटले

नवी दिल्ली – देशभरातील अनेक प्रमुख शहरात लॉकडाऊनच्या काळात हत्या आणि बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल ९० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.तसेच चोरी,...
Read More
post-image
देश

BSNLने प्रीपेड प्लानची उपलब्धता वाढवली

नवी दिल्ली – सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने आपल्या प्रीपेड प्लानच्या व्हाऊचरची उपलब्धता वाढवली आहे. या व्हाऊचर प्लानचे नाव Vasantham Gold आहे. या प्लानची...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं...
Read More
post-image
मनोरंजन

निर्माते करीम मोरानींची कन्या शजा हिला ‘कोरोना’

मुंबई – अभिनेता शाहरुख खानचे निकटवर्तीय असलेले प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्या मुलीला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. निर्माते करीम मोरानी यांची कन्या शजा...
Read More
post-image
देश राजकीय

तबलिगी जमातवर कारवाई करा, अमरसिंह यांची मागणी

नवी दिल्ली – देशभर लॉकडाऊन असतानाही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून तब्बल 17 राज्यांत कोरोना संसर्ग पसरवणाऱ्या तबलिगी जमातवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यसभा खासदार...
Read More