महाराजा तो महाराजाच  – eNavakal
लेख

महाराजा तो महाराजाच 

एखाद्या सरकारी कंपनीचे नशिबही चांगले असू शकते. कंपनी तोटयात चालते असे कारण पुढे करून सरकारने स्वतःच्या अनेक कंपन्यांची निर्गुंतवणुक केली त्याच धर्तीवर सरकारची मालकी असलेल्या एअर इंडिया विमान कंपनीचीदेखील विक्री करण्याचा घाट घातला गेला. गेले सहा महिने एअर इंडियाची विक्री करण्यासंबंधात तयारी केली गेली. यासाठी निविदा मागवल्या गेल्या. परंतु एकाही खाजगी विमान कंपनीकडून किंवा संस्थेकडून सरकारला प्रतिसाद मिळाला नाही. कोणीही ही विमानकंपनी खरेदी करण्यासाठी पुढे येऊ नये हा तसा आश्चर्यकारकच प्रकार ठरतो. आज सगळ्या विमान कंपन्या फायद्यामध्ये चालतात. भारतात गेल्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजेच हे क्षेत्र स्पर्धेसाठी खुले केल्यानंतर अनेक नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या आणि त्या यशस्वी झाल्या. जेट एअरवेज, इंडिगो, एअर एशिया, या काही कंपन्या आल्या. फक्त किंगफिशर ही कंपनी मात्र फायद्यात चालू शकली नाही. कारण त्याचा मालकच दिवानाही होता आणि दिवाळखोरही होता. परंतु आज संपूर्ण देशात असलेले एअर इंडियाचे जाळे आणि तिच्याकडे असलेली भरपूर स्थावर मालमत्ता याचा विचार केला तर ही कंपनी सहजपणे फायद्यात चालू शकते. सरकारकडून या कंपनीत वारंवार राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे ती फायद्यात चालू शकलेली नाही. परंतु एकेकाळी महाराजा हे बोधचिन्ह असलेली कंपनी अगदी महाराजाच्या थाटाप्रमाणे रुबाबात चालत होती. तिला फायदाही होत होता. लोकांनीदेखील कंपनीच्या कारभाराला चांगली पसंती दिली होती. सरकारसाठी ही कंपनी म्हणजे एकाअर्थी स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेचेच लक्षण मानली जात होती. खरे तर तिच्या कारभारामध्ये व्यावसायिकता आणून ती यशस्वीपणे चालवता येऊ शकते. सरकारने त्यातला हस्तक्षेप कमी केला. आणि चांगले व्यावसायिक दृष्टीकोन असलेले अधिकारी तिथे नेमले तर त्या कंपनीला इतर कंपन्यांप्रमाणेच नफा होऊ शकतो. परंतु खाजगीकरणामधून पैसे उभे करणे अशा एकमेव राजकीय स्वार्थापोटी या महाराजाचाच लिलाव करायला सरकार निघाले होते. परंतु या महाराजाचे नशिबही इतके महाबलवत्तर आहे की त्याला खरेदी करण्यासाठी एकही महाभाग पुढे आला नाही. शेवटी महाराजा तो महाराजाच आहे. त्याला खरेदी करणारा अजून तरी पुढे आलेला नाही.निदान ही गोष्ट तरी एक सुलक्षणी कौल मानून सरकारने एअर इंडियाला फायद्यात आणण्याचा विचार करावा. कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने एअर इंडियाची विक्री करण्याचा बेत रद्द करण्याशिवाय केंद्र सरकारपुढे दुसरा पर्यायही नव्हता. भारतसरकारच्या मालकीची एक प्रतिष्ठित आणि तितकेच सुरेख बोधचिन्ह असलेली ही विमान कंपनी तशीच कायम ठेवणे सरकारच्या आणि देशाच्याही हिताचे आहे. विमान चालवणे हे काही सरकारचे काम नाही. असा फोलकट युक्तीवाद काही तथाकथित अर्थतज्ञ करतात. परंतु फायद्यात चालणार्‍या तेलकंपन्या सरकार स्वतःकडे ठेवणार आणि तोट्यात चालणार्‍या कंपन्या विकून फुकून मोकळे होणार. हे काही योग्य नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More