महामार्गावरील खड्डयामुळे वाहनचालक हैराण  – eNavakal
News महाराष्ट्र

महामार्गावरील खड्डयामुळे वाहनचालक हैराण 

वाडा –  वाडा – भिवंडी महामार्गावरील किनईपाडा या ठिकाणी महामार्गावर ओढ्याचे पाणी साचून महामार्ग तुंबत असून या ठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात वाहने उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळी असाच एक गॅस सिलेंडर भरलेला टेम्पो खड्ड्यात अडकला होता.

वाडा भिवंडी या महामार्गावर जागोजागी असंख्य जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. यातच किनईपाडा या ठिकाणी लोखंड कंपनी जवळ महामार्गाच्या रुंदीकरणावेळी नैसर्गिक नाला मोकळा न केल्याने आता या ठिकाणी महामार्गावर पाणी तुंबते. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते व एका दिशेला याठिकाणी रस्ता खचल्याने तो धोकादायक झालेला आहे. हा धोका लक्षात घेता तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीला चाकूने भोसकले

मुंबई- विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणे एका 39 वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करणार्‍या या व्यक्तीला तरुणानेच चाकूने भोसकले. त्यात फिरोज नियास खान हा...
Read More
post-image
News मुंबई

ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा महसूल बुडविणार्‍या 11 जणांना अटक! कॅशसहित इतर मुद्देमाल जप्त

मुंबई- ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अकरा जणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सात ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई करून एक लाख...
Read More
post-image
News देश निवडणूक

मध्य प्रदेशचे कमलनाथ नवे मुख्यमंत्री

भोपाळ – विधानसभा निवडणुकांत यश मिळवल्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज दिवसभर जोर बैठका...
Read More
post-image
News देश

योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगावी-अखिलेश यादव

लखनऊ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण...
Read More
post-image
News मुंबई

ईदला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन! लाऊडस्पीकरचा आवाज वाढला

मुंबई -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने आदेश देवूनही राज्यात ध्वनिप्रदूषण होत असताना तक्रार देऊनही राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने आज तीव्र...
Read More