महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जाणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जाणार

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर येथील शिवाजी पार्कमधील महापौर बंगल्यात उभारले जाणार आहे. त्यासाठी मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना त्यांचा बंगला खाली करावा लागणार आहे. महापौरांसाठी पर्यायी बंगला म्हणून राणीबागेत बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. या बंगल्यात राहायला जाण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आवराआवर सुुरू केली आहे. येत्या आठवड्याभरात महापौर राणीबागेतील पर्यायी बंगल्यात राहायला जाणार आहेत.

दादर शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सतत 40 वर्षे लाखोंचे दसरा मेळावे झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे गेली 25 वर्ष मुंबईचे महापौरपद शिवसेनेकडे आहे. महापौर बंगल्याला अनेकवेळा बाळासाहेबांनी भेट दिली आहे. या कारणामुळे महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे. स्मारक बनवण्यासाठी सदर जागा स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरित झाली असून बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर बंगला सोडावा लागणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More