महापौरांनी समिती अध्यक्षांची घेतली झाडाझडती – eNavakal
News मुंबई

महापौरांनी समिती अध्यक्षांची घेतली झाडाझडती

मुंबई,- पेशाने शिक्षक असल्याने एरव्ही शाळांमधील वर्गांवर अचानक भेटी घेऊन मुलांची झडती घेणार्‍या मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी अशाचप्रकारे सर्व समिती अध्यक्षांच्या दालनांमध्ये अचानक भेटी दांडी बहाद्दर अध्यक्षांचीच झाडाझडती घेतली. महापौरांच्या या अचानक पाहणीमध्ये सभागृहनेत्या, उद्यान व बाजार समिती अध्यक्ष आणि स्थापत्य समिती शहर समिती अध्यक्ष सोडले तर एकही अध्यक्ष कार्यालयांमध्ये दिसून आले नाही. या अचानक भेटीत महापौरांनी कर्मचार्‍यांचीच शाळा घेतल्यामुळे हे कर्मचार्‍यांची उत्तरं देताना पार भंबेरी उडाली.
ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशीच समिती अध्यक्ष काय करत आहेत, ते कार्यालयांमध्ये उपस्थित आहेत का याची अचानक भेट देऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची सर्वांचाच समाचार घेतला. महापौरांनी, प्रारंभीच जुन्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या कार्यालयात भेट दिली. परंतु कार्यालय बंद असल्यामुळे त्यांनी कर्मचार्‍यांकडे याची विचारणा केली. यावेळी त्यांनी अध्यक्ष रोज येतात, आज का आले नाही, याची विचारणा करत कर्मचार्‍यांची शाळाच घेतली.

त्यानंतर राज्य सरकारने बदल केलेल्या सुधारीत विकास आराखड्यासंदर्भात जनतेला नकाशा पाहण्यासाठी केलेल्या कक्षाला भेट दिली. या कक्षात नगरसेवक कधी पाहणीसाठी येतात अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी एच-पूर्व विभागाचा नकाशा दाखवण्याची सूचना केली. परंतु यावेळी एच-पूर्वचा प्लॅनरच तिथे उपस्थित नव्हता. त्यावर महापौरांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत जर या विभागाचा नागरिक कोणी आला तर त्याला मार्गदर्शन कोण करणार असा सवाल केला.महापौरांनी त्यानंतर स्थापत्य समिती (उपनगरे),बाजार व उद्यान समिती, विधी समिती आणि शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांच्या दालनात भेट दिली. या चारही समित्यांचे अध्यक्ष दालनात उपस्थित नव्हते. मात्र, बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना,महापौर आल्याची माहिती मिळताच ते धावत आपल्या दालनात परतले.

मात्र, सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थापत्य शहर समिती अध्यक्षा अरुंधती दुधवडकर या उपस्थित असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधत महापौरांनी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याही कार्यालयात भेट दिली. यावेळी रवी राजा हेही दालनात उपस्थित असल्याने तिथे चायपान करत त्यांनी आपल्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला.
9 ऑगस्ट हा क्रांतीदिन आहे. यादिवशी समिती अध्यक्षांनी कार्यालयात नसावं आणि तेही महाराष्ट्र बंदचं कारण देत हे योग्य नसून समिती अध्यक्षपदाची जी जबाबदारी पक्षाने खांद्यावर टाकली आहे, त्या समितीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले जावेत,हीच भावना आहे. परंतु समिती अध्यक्षच गैरहजर राहत असल्याची तक्रार आपल्याकडे येत होत्या, त्यामुळेच ही अचानक पाहणी करून याचा आढावा घेतला असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यापुढे समिती अध्यक्षांनी, कार्यालयात येणार नसेल तर याची कल्पना महापौरांना द्यावी,असा फतवाच समिती अध्यक्षांना बजावत त्यांनी त्यांच्या अंगावर कडक शिस्तीची छडीच उगारली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत दादरमध्ये व्यापार्‍यांनी काढला मोर्चा

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दादरमधील व्यापार्‍यांनी मोर्चा काढून शहिद जवानांना आदरांजली वाहिली. या व्यापार्‍यांनी आज दुकाने बंद ठेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा...
Read More
post-image
News देश

हिमाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन एक जवान शहीद! 5 बेपत्ता

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात हिमस्खलन झाले असून लष्कराचे सहा जवान बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यातील एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अद्याप...
Read More
post-image
News देश

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसची युती

चेन्नई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी जाहीर झाली. दोन्ही पक्षात जागावाटप झाले आहे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9,...
Read More
post-image
News मुंबई

फडणवीसांच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई – शिवसेना- भाजपाच्या दिलजमाईनंतर आता दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा जंगी बेत आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी! शरद पवारांची मोदींवर टीका

नांदेड – पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, अशी घणाघाती टीका...
Read More