News महाराष्ट्र

महापुरूषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा – रामदास आठवले

खेड (रत्नागिरी) –  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या खेडमधील जिजामाता उद्यान येथील  पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचा तीव्र निषेध करून हे निंदनीय प्रकार रोखण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व महापुरूषांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी शासनाने सीसीटीव्ही लावावेत, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले. आज त्यांनी खेड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी तसेच पुतळा विटंबना करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
खेडमधील पुतळा विटंबनेप्रकरणी रामदास आठवले यांनी आज खेडमध्ये भेट देऊन  सर्व संबंधितांची बैठक घेतली. जिल्हा अधिकारी ; समाज कल्याण अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अद्याप अटक न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पुतळा विटंबना करणारी समाजकंटकांना त्वरित अटक करण्याचे निर्देश रामदास आठवलेंनी पोलीस प्रशासनाला दिले. यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर ; एस पी प्रणय अशोक अप्पर जिल्हाधिकारी पैलदार ; तहसीलदार अमोल कदम   सुनील सैफ समाज कल्याण अधिकारी ; डी वाय एस पी शीतल जानवे ; खेड नगरपालिका चे मुख्याधिकारी शेडगे ; आदी प्रशासकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.यावेळी रिपाइंचे विवेक पवार;  सिद्धार्थ कासारे ; महेंद्र शि, र्केआदेश मर्चंडे, सुशांत सकपाळ;अमित तांबे विकास कदम ; दादा मर्चंडे; सचिन मोहिते; संदेश मोहिते सुशील महाडिक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More