महापालिका शाळांमधील मुलांना गडकिल्ल्यांची ओळख? – eNavakal
News मुंबई

महापालिका शाळांमधील मुलांना गडकिल्ल्यांची ओळख?

मुंबई –  मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या सहली या किडझेनियाच्या ठिकाणी आयोजित केल्या जात आहेत. परंतु अशा ठिकाणी सहली आयोजित करून मुलांच्या संगणकीय कौशल्यांमध्ये वाढ होत असली तरी मुलांना ऐतिहासिक वास्तुंची ओळख होणे हे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांच्या सहली गड, किल्ले आदी ठिकाणी सहल आयोजित करण्याची मागणी आता नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या सहली या ऐतिहासिक ठिकाणी आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशाप्रकारे सहली आयोजित केल्यास शाळकरी मुलांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळेल आणि या मुलांमध्ये गिर्यारोहणाची आवडही निर्माण होईल,असे त्यांनी म्हटले आहे.

महापालिका शाळांमधील मुलांना सर्वकष ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने महापालिका अनेक उपक्रम राबवत असते. या उपक्रमांतर्गत इयत्ता 4थी ते 7वी पर्यँतच्या मुलांना घाटकोपर येथील किडझेनिया येथे सहली आयोजित करण्यात येतात. मात्र, या माध्यमातून मुलांना वीजकीय माध्यमांचा वापर कसा करायचा याचे ज्ञान प्राप्त होते. परंतु महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासारख्या शूर राजांची भूमी असून या राज्यात त्यांनी उभारलेल्या गड, किल्ले यांची उज्ज्वल परंपरा आहे.

महापालिका शाळांमधील मुलांना संगणकीय तसेच वीजकीय माध्यमांचे ज्ञान आवश्यक आहेतच. याशिवाय ज्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या शाळांमधील मुलांच्या सहली गड, किल्ले आदी ऐतिहासिक ठिकाणी आयोजित केल्या जातात, त्याच धर्तीवर महापालिका शाळांमधील मुलांचया सहलीही राज्यातील प्रमुख गड आणि किल्ल्यांवर आयोजित करून त्यांना शूर राजांनी कशाप्रकारे पराक्रम गाजवला आहे त्याची माहिती आणि ओळख करून दिली जावी,असे समिता कांबळे यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More