महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी चैत्यभूमीवर ‘भीमज्योत’ प्रज्वलीत होणार – eNavakal
News मुंबई

महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी चैत्यभूमीवर ‘भीमज्योत’ प्रज्वलीत होणार

मुंबई- हुतात्मा स्मारकावर कायम तेवत असलेल्या ज्योतीच्या धर्तीवरच चैत्यभूमीवरही कायमस्वरूपी ‘भीमज्योत’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रज्वलित होणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला असून, लवकरच काम चालू होणार आहे. वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव मांडला होता.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत तेवत ठेवावी, अशी मागणी एप्रिल 2016 मधील विधानसभेत नगरविकास विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चेत सहभागी होताना आमदार कोळंबकर यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अनेक दिवस हा प्रस्ताव रखडला होता. मात्र, या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ही भीमज्योत प्रज्वलित करण्याचा निर्धार करून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर संबंधित विभागातील अधिकार्‍यांसोबत दोन बैठका घेतल्या.

दरम्यान, वास्तुविशारद शशी प्रभू आणि महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने आराखडा तयार करण्यात आला असून, हा आराखडा मंजुरीसाठी मेरीटाइम बोर्ड, पर्यावरण खाते, मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोळंबकर यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई विदेश

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागे टाकले

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

प्लास्टिक फुलांवर बंदीचा राज्य सरकारचा विचार

वर्धा – लॉकडाऊन काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पीपीई किट घातलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडले, ६० तोळे सोने लंपास

फलटण – शहरातील मध्यवर्ती भागातील एका ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ६० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी अज्ञात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

नवी मुंबईतील कोविड रुग्णालयासाठी आजपासून पाइपलाइनने ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी परिसरात सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना आता पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त...
Read More
post-image
कोरोना देश राजकीय

गोव्यातील माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू

मडगाव – कोरोनामुळे गोव्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या...
Read More