महात्मा फुुले आरोग्य योजनेत आयुष्यमान योजनेतील आजारांचा समावेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य महाराष्ट्र

महात्मा फुुले आरोग्य योजनेत आयुष्यमान योजनेतील आजारांचा समावेश

धुळे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 23 सप्टेंबरला आयुष्यमान आरोग्य योजना राष्ट्रीय स्तरावरून सुरू करीत आहेत. या योजनेतून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. महाराष्ट्र शासन देखील या आयुष्यमान योजनेच्या सर्व आजारांचा समावेश राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेत करून त्या माध्यमातून ज्यांना आयुष्यमान आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यांनाही अत्याधुनिक असे मोफत उपचार मिळण्याची सोय करून देईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळ्यात अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केली.

राज्यातील गरीब गरजु रुग्णांच्या दारी खासगी आणि सरकारी ख्यातनाम डॉक्टरांचे उपचार पोहचवण्यासाठी ही महा आरोग्य शिबिराची पंरपरा सुरू केल्याचे सांगत आतापर्यंत 25 लाख रुग्णांवर या शिबिरांमधून उपचार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धुळे जिल्हा आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने धुळ्यात जिल्हास्तरीय अटल आरोग्य शिबिर आज धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, खा. डॉ.हिना गावित, धुळ्याचे आ. अनिल गोटे, जळगावचे आ. राजुमामा भोळे, आ.स्मिता वाघ, डॉ.शिंगारे, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मनिषा गजभिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More