मल्‍लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जीवन गौरव – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मल्‍लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जीवन गौरव

मुंबई – राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज राज्य सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या 2017-18 च्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. मल्‍लखांब खेळात मोठे योगदान देणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाला वेगळी ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या दादरच्या प्रख्यात श्रीसमर्थ व्यायाम मंदिराच्या उदय देशपांडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटविश्‍वात सांगलीचे नाव मोठे करणार्‍या स्मृती मंधानालादेखील शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. कॅरमपट्टू पंकज पवारला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. माऊंट एव्हरेस्ट किलीमांजरोसारखी शिखरे सर करणार्‍या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरविण्यात येईल.

येत्या रविवारी 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. गेट वे ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार समारंभ सोहळा होणार आहे. विविध खेळातील 55 खेळाडूंना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक-कार्यकर्ते या विभागात 7 पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये 9 पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार 15 जणांना देण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून, जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 3 लाख तर क्रीडा मार्गदर्शक छत्रपती, एकलव्य पुरस्कार विजेत्यांना 1 लाखाचे पारितोषिक मिळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More