मल्ल्याचा फोर्स इंडियावरील ताबा गेला – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

मल्ल्याचा फोर्स इंडियावरील ताबा गेला

लंडन – भारतातील बँकांचे हजारो कोटी बुडवून लंडनमध्ये वास्तव्य करीत असलेल्या विजय मल्ल्या यांची फॉर्म्युला वनमधील फोर्स इंडिया या संघाची मालकी आता संपलेली आहे. मात्र त्यामुळे फोर्स इंडियाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या नोकर्‍यांवर कोणतीही ‘गदा’ आलेली नाही. संघ व्यवस्थापक, संयुक्त प्रशासक आणि कॅनडाचे लॉरेन्स स्ट्रोल यांच्या समितीत करार झाला असून त्यामुळे फोर्स इंडिया फॉर्म्युला वन शर्यतीत सुसाट धावण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे.
विजय मल्ल्या यांची गेली दहा वर्षे फोर्स इंडियावर मालकी होती. पण गेल्या महिन्यात हंगेरी ग्रांप्रिच्या आधी संघाचा ड्रायव्हर सर्जियो पेरेज याने तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासकांनी संघाला आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणानंतर फोर्स इंडियाचे सीओओ ओत्मार स्जाफनोर म्हणाले, नव्या करारानुसार फोर्स इंडियावर आलेले संकट दूर झाले असून आता आमचे रेसर दबावाविना मैदानात उतरताना दिसतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

येत्या दहा वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही – चंद्रकांत पाटील 

कल्याण –  राज्यभरातील रस्त्यांवर येत्या १० वर्षात एकही खडडा दिसणार नाही.असे रस्ते शासनाच्यावतीने तयार केले जातील असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
Read More