…मला या कारणाने संघाबाहेर काढले-मितालीचे आरोप पत्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

…मला या कारणाने संघाबाहेर काढले-मितालीचे आरोप पत्र

मुंबई – महिला वर्ल्ड टी-20 च्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत मिताली राजला वगळण्यात आले होते, या मुद्द्याला घेऊन सोशल मिडीयाच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चा रंगली होती, त्यानंतर अखेर मिताली राजने BCCI CEO राहूल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात महिला वर्ल्ड टी-20 दरम्यान मितालीला प्रशिक्षक रमेश पोवार आणि एडल्जी कशा प्रकारची वागणूक देत होते, याप्रकारची तक्रार नोंदवली आहे.


महिला वर्ल्ड टी-20 मध्ये उपांत्यपुर्व फेरीचा सामना इंग्लंडविरूध्द खेळवण्यात आला होता, या सामन्यात नवखेळाडूंना प्राधान्य देण्याच्या निमित्ताने मिताली राजला वगळले होते, पण याआधी झालेल्या वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात मितालीने चांगली कामगिरी बजावली होती. तरी देखील तिला आगामी सामन्यातून वगळण्यात आले होते, परिणामी इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. यासंदर्भात मितालीने आपले मौन सोडले आणि या सामन्यादरम्यान मितालीसोबत कशाप्रकारची वागणूक दिली जायची याबद्दल खंत व्यक्त केली.

‘टी-२०’ प्रशिक्षकांनी इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात मला वगळले, त्यावेळी कर्णधार हरमनप्रित कौरने कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही, त्याबद्दल नक्कीच मी तिच्यावर नाराज आहे, असे मत मितालीने स्वत:च्या पत्रात नोंदवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच काहीजण स्वत:च्या पदाचा गैरवापर करत आहेत. मला बर्बाद करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा संताप मितालीने पत्राद्वारे व्यक्त केला आहे.


थेट आरोप करत मितालीने BCCI CEO राहूल जोहरी यांना लिहिलेल्या पत्रात लिहले आहे की, ‘मला माझ्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता’. पण या सर्वांमुळे मला माझे स्वप्न साकारता आले नाही. या सगळ्या दरम्यान कोच रमेश पोवार यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली आहे, मी नेट प्रॅक्टिस करत असताना कोच पोवार कोणतेच प्रशिक्षण देत नव्हते, मी त्यांच्याशी संवाद करण्यास गेले असता ते फोनवर बोलण्याच्या निमित्ताने निघून जायचे असा आरोप मिताली राजने कोच रमेश पोवार, एडल्जी आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांच्यावरती केले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राजस्थानच्या काँग्रेस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र शिक्षण

कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड19’चा उल्लेख नसेल – कृषीमंत्री दादा भुसे

मुंबई – कोरोना काळात परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे निकाल दिला जात आहे. मात्र या गुणपत्रिकांवर कोविड 19 असा उल्लेख नको, अशी...
Read More
post-image
देश

भारताला इराणचा मोठा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळले

नवी दिल्ली – इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भारत...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

अंबरनाथ, बदलापूरचे व्यापारी लॉकडाऊनमुळे आंदोलनाच्या तयारीत

अंबरनाथ – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्या चार महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता सध्या लागू केलेल्या १९ जुलैपर्यंतच्या...
Read More