मलमिश्रित पिण्याच्या पाण्यामुळे पनवेलमध्ये खळबळ – eNavakal
जीवनावश्यक मुंबई

मलमिश्रित पिण्याच्या पाण्यामुळे पनवेलमध्ये खळबळ

पनवेल -पनवेल शहरातील पंचरत्न हाॅटेल ते उरण नाका रोडवरील गृहनिर्माण सोसायट्यांतील घरांमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून मलमिश्रित (शौच) पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले असून या प्रकारामुळे पनवेलमध्ये खळबळ माजली आहे.

गुलरेज, गुरमर्ग, गुलमोहर आणि ओम सदनिका या सोसायट्यांच्या पाण्याच्या टाकीत मलमिश्रित पाणी आढळले. सकाळी सकाळी नळातून मल येवू लागल्याने नागरिक हैराण झाले. हा प्रकार नेमका काय आहे, हेच आधी कळाले नाही. मलमिश्रित पाणी असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक हवालदिल झाले. गेल्या काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यातच गढूळ पाणी पुरवठा होवू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आज पिण्याच्या पाण्यातून मल  आल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या-त्या ठिकाणी जावून पाहणी केली आहे. मुख्य जलवाहिनी बंद ठेवण्यात आली आहे. कोणत्या ठिकाणाहून हे पाणी मिश्रित झाले आहे. त्याचा शोध सुरू आहे. लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्यात येतील. सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. असे पनवेल महापालिका.उपायुक्त संध्या बावनकुळे यानी सांगितले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More