मलबार हिलचे नाव रामनगरी? – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलबार हिलचे नाव रामनगरी?

मुंबई – मुंबईतील एलफिन्स्टन या रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यानंतर मलबार हिलचे नाव रामनगरी करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेपुढे ठेवण्यात आल्याने मलबारहिलचे लवकरच बारसे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मनसेमधून शिवसेनेत गेलेले आणि सुधार सभेच्या अध्यक्षपदी निवड झालेले दिलीप लांडे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

ब्रिटिश काळापासून वास्तवास असलेल्या काही ठिकाणांची नावे बदल्याचा सपाटा सुरूच आहे, पण मलबार हिल हे ठिकाण ब्रिटिश काळाच्या पहिल्यापासूनच म्हणजे राम-लक्ष्मणाच्या काळापासून असल्याचा दावा केला जात आहे, त्याच बरोबर राम-लक्ष्मण यांच्या वनवासाच्या वेळेला ते मलबार हिल या ठिकाणी आले होते, हे ठिकाण त्यांना आवडले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मलबार हिल या ठिकाणाला ‘रामनगरी’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव सभेसमोर मांडला आहे, तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयूक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणआर आहे.

मुंबईतील बदलेली काही ठिकाणांची नावे पुढीलप्रमाणे…
1995 साली मुंबापुरीचे मुंबई करण्यात आले
त्यानंतर ब्रिटिश कालीन ठिकाणांची नावे बदलण्यात आली…
व्हिक्टोरिया टर्मिनलचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नामकरण केले
जोगेश्वरी येथील नवीन स्थानकाचे नाव राम मंदिर असे नामकरण केले
19 जुलै 2018 रोजी एलफिन्स्टन रोडचे प्रभादेवी असे नामकरण केले

नामकरण करण्याची मागणी केली जात असणारी ठिकाणे…
1839 सालचे बॉंबेचे राज्यपाल सर रॉबर्ट ग्रॅंट यांच्या नावे असलेले ग्रॅंट रोडचे नाव ग्रामदेवी करावे
करी रोडचे नाव लालबाग रेल्वे स्थानक करावे
स्टॅंडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी करावे
हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकाचे नाव काळाचौकी करावे
रे रोडचे नाव घोडपदेव करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More