मर्क्स, ऑटोमेशन, टिएटोची आगेकूच- आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा  – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

मर्क्स, ऑटोमेशन, टिएटोची आगेकूच- आंतर आयटी क्रिकेट स्पर्धा 

पुणे- आयडीयाज ‘अ’ सास कंपनी यांच्यातर्फे अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत  मर्क्स, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन व टिएटो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.
पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत वैभव महाडिकच्या जलद 74 धावांच्या बळावर मर्क्स संघाने टेक महिंद्र संघाचा 31 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 4 बाद 180 धावा केल्या. यात शुर्वा भंडारीने नाबाद 44 धावा करून वैभवला सुरेख साथ दिली. 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  टेक महिंद्र संघ 20 षटकात 8 बाद 149 धावांत रोखला. मर्क्स संघाकडून दिनेश वाडकर, व्यंकटेश अय्यर व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. वैभव महाडिक सामनावीर ठरला.
दुसर्‍या लढतीत रोहन खलाटेच्या जलद नाबाद ९१ धावांच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने आय प्लेस संघाचा ७७ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकात 4 बाद 213 धावांचा डोंगर रचला. यात श्रीकांत कासारने 23 चेंडूत 41 धावा करून रोहनला सुरेख साथ दिली. 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आय प्लेस संघ केवळ 17.3 षटकांत सर्वबाद 135 धावांत गारद झाला. यात आनंद कुमारने 69 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. रोहन खलाटे सामनावीर ठरला.
तिसर्‍या लढतीत अंकित जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टिएटो संघाने टॅलेंटीको संघाचा 22 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गणेश अंब्रेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टिएटो संघाने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. यात इमतीयाझ शेखने 40 करून गणेशला छान साथ दिली. 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वसिफ काझमीच्या 62 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अंकित जैनच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीको संघ 20 षटकांत 8 बाद 162 धावा रेखला. 21 धावांत 4 बाद करणारा अंकित जैन सामनावीर ठरला .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत दादरमध्ये व्यापार्‍यांनी काढला मोर्चा

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दादरमधील व्यापार्‍यांनी मोर्चा काढून शहिद जवानांना आदरांजली वाहिली. या व्यापार्‍यांनी आज दुकाने बंद ठेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा...
Read More
post-image
News देश

हिमाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन एक जवान शहीद! 5 बेपत्ता

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात हिमस्खलन झाले असून लष्कराचे सहा जवान बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यातील एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अद्याप...
Read More
post-image
News देश

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसची युती

चेन्नई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी जाहीर झाली. दोन्ही पक्षात जागावाटप झाले आहे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9,...
Read More
post-image
News मुंबई

फडणवीसांच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई – शिवसेना- भाजपाच्या दिलजमाईनंतर आता दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा जंगी बेत आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी! शरद पवारांची मोदींवर टीका

नांदेड – पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, अशी घणाघाती टीका...
Read More