मराठ्यांना आरक्षण मिळण्याआधीच समन्वयकांमध्ये फूट – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठ्यांना आरक्षण मिळण्याआधीच समन्वयकांमध्ये फूट

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात ATR उद्या सभागृहात सादर करणार असतानाच दुसरीकडे मराठा समाजामध्ये फूट पडली असल्याचे समोर येत आहे. ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश करे पाटील आणि क्रांतीकारी मेर्चाचे समन्वयक माऊली पाटील यांच्यात वाद निर्माण झाला असल्याचा माहिती सूत्रांनी दिली. ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश पाटील यांनी थेट निलेश राणे यांच्यावर मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये फूट पाडली असल्याचे आरोप केले आहेत. तर माऊली पाटील यांनी मराठा समाजाचा नेता बनन्याच्या दृष्टीने रमेश यांची स्वप्ने असल्याची टीका केली. तर एकीकडे मराठा समाजाच्या वतीने संवाद यात्रा काढणारे सरकारचे दलाल आहेत, सरकार मराठा समन्वयकांमध्ये फूट पाडत आहेत, असा आरोप मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक करत आहेत. अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये जर असे वाद निर्माण होत असतील तर मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार याचीच चिंता आता मराठा समाजाला लागून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More