मराठी माध्यमात विद्यार्थ्यांच्या दरात घसरण सुरूच – eNavakal
मुंबई शिक्षण

मराठी माध्यमात विद्यार्थ्यांच्या दरात घसरण सुरूच

मुंबई- बदलत्या काळानुसार इंग्रजी भाषेचे महत्व वाढल्यामुळे इंग्रजी शिक्षणाचे महत्व देखील वाढत चालले आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी पालक सतत प्रयत्न करत असतात. परिणामी मराठी माध्यमांच्या शाळेवर जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. मराठी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थांच्या आकड्यात प्रत्येक वर्षी घट दिसून येत असून यात मध्ये घसरण सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील मनपा शाळांमधील मराठी माध्यमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मागील 4 वर्षात तब्बल 90 हजार विद्यार्थ्यांची घट झाली असल्याची माहिती माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.
प्रजा फाऊंडेशन संस्थेने जाहीर केलेल्या अहवाला वरून 2008-09 ते 2015-16 या वर्षांदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) शाळांमधील प्रवेशाचा आकडा 68,325 इतक्या फरकाने घसरलेला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका दरवर्षी 49,835 रुपये खर्च करणार असल्याची योजना राबवत आहे. तरीही विद्यार्थ्यी गळतीत वाढ होतच असल्याचे दिसून आले आहे.
या बाबत अधिक माहिती देताना प्रजा फाऊंडेशन संस्थापक आणि व्यवस्थापक विश्वास मेहता म्हणाले की, आम्ही सादर केलेल्या अहवालात मागील पाच वर्षांची आकडेवारी आहे. 2015-16 मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची संख्या 38,329 दाखवण्यात आली होती, परंतु आम्ही आरटीआय ( माहितीचा अधिकार ) द्वारे मिळवलेल्या माहितीनुसार 2015-16 दरम्यान पहिल्या इयत्तेत निव्वळ 34,549 विद्यार्थांनी प्रवेश घेतला. जर ही घसरण अशीच राहीली तर 2019-20 दरम्यान पहीलीत प्रवेश घेणारे केवळ 5,558 विद्यार्थीच उरतील. मराठी शाळांमध्ये जाणार्‍या मुलांची संख्या कमी होत राहणे ही चिंतेची बाब आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More