मराठा समाज मागास असल्याचे अन्य समाजाचेही मत- राज्य सरकार – eNavakal
News

मराठा समाज मागास असल्याचे अन्य समाजाचेही मत- राज्य सरकार

मुंबई- मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करताना अन्य समाजाचाही त्या सर्व्हेक्षणात सहभाग होता. त्यांनीही मराठा समाजाला मागास असल्याचे होकारर्थीच उत्तर दिले, असा दावा राज्य सरकारने आज केला. मागास प्रवर्ग आयोगाने मराठा समाजाचे केलेले सर्व्हेक्षण आणि अहवालावर याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अनिल साखरे यांनी आज बाजू मांडली.
आरक्षण कायद्यात नव्याने दुरुस्ती करून 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या आणि आरक्षणाला समर्थन देणार्‍या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाला आणि अहवालाला आक्षेप घेतला होता. प्रामुख्याने मराठा समाज ज्या भागांत आहे त्या भागाचा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे करताना खरोखरच मराठा समाज हा मागास आहे काय? असा प्रश्न सर्व्हेक्षणात उपस्थित करण्यात आला होता. त्या सर्व्हेक्षणात कुणबी समाजातील 89 टक्के, ओबीसी समाजातील 90 टक्के आणि ईतर मागास वर्गातील 89 टक्के लोकांनी मराठा समाज हा मागास असल्याचे उत्तर दिले. याकडे अ‍ॅड. साखरे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच हे सर्व्हेक्षण करताना आयोगाने राज्याचा सारासार विचार केला आहे. ज्या भागात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे तर या भागाची निवड करून सर्व्हेक्षण करण्यात आले. विदर्भात जरी मराठा समाज असला तरी स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाचे काही नेते मंडळी कुणबी मराठा म्हणून घेत आहे. कुणबी मराठा हा ओबीसी गटात मोडतो. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचे आणि अहवालाचे जोरदार समर्थन केले. आज सुनावणी अपूर्ण राहील्याने ती सोमवार 11 मार्चला घेण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

ड्रायव्हरने जाणूनबुजून बस घातली तलावात, २१ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनमध्ये एका ड्रायव्हरने जाणूनबुजून बस तलावात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे २१ जणांचा मृत्यू झालाय. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती....
Read More
post-image
मनोरंजन

चौकटी बाहेरच्या चित्रपटांची नव्याने ओळख, ‘रिव्हिजिट सिनेमा’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई – कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात बराचसा प्रेक्षक वर्ग ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीज तर अगदी जागतिक चित्रपटांकडेही वळला. अशावेळी आपला प्रेक्षकवर्ग मराठी दर्जेदार चित्रपटांकडे...
Read More
post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग तंत्रज्ञान देश

डिजिटल भारतासाठी गुगलची ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सुंदर पिचाई यांची घोषणा

नवी दिल्ली – भारतामध्ये डिजिटायजेशनसाठी गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा खुद्द गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. यासंदर्भात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पुढच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून जनाधार सिद्ध करावा, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोल्हापूर – राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या २० आणि १० जागा आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार वाचले, सचिन पायलट यांचे बंड मागे

जयपूर – राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड तुर्तास शमले आहे. गेहलोत सरकार वाचले आहे. सचिन पायलट यांनी भाजपाबरोबर...
Read More